नगर -नगर तालुक्यातील आगडगाव येथे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत वृक्ष लागवड व पीक प्रात्यक्षिक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कृषी सहाय्यक प्रतिभा राऊळ, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय जावळे, पत्रकार मुरलीधर कराळे, सहाय्यक कृषी अधिकारी आव्हाड उपस्थित होते.
यावेळी राऊळ यांनी गट शेती, सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने पीक प्रात्यक्षिक अंतर्गत महिलांची शेतीशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांचे उत्पन्न वाढावे, शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, जावळे यांनी सांगितले.