होळकर पुलाजवळील जलवाहिनी फुटली

पुणे – शहरातील पाणी पुरवठा दुरूस्तीसाठी बंद असताना गुरुवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास होळकर पुलाजवळ एका जलवाहिनीतून पाण्याचे मोठे कारंजे उडत होते. स्थानिकांसह अनेकांना हि जलवाहिनी फुटली असे वाटले. मात्र व्हॉल्व्ह दुरुस्ती करताना जलवाहिनी तील शिल्लक असणारे पाणी वेगात उडत होते. त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ अभियंता बुध्दप्रकाश वाघमारे यांनी दिली.

होळकर पूलानजीक जलवाहिनीचे जुने रबरी जोड दुरूस्ती करण्याठी तासाभरापूर्वी एअरव्हॉल्व्ह उघडला होता. दरम्यान, जलवाहिनीतील शिल्लक पाणी वेगात बाहेर उडत होते. जलवाहिनी फुटली असावी किंवा गळती होत असावी असे वाटले. मात्र प्रत्यक्षात ते दुरूस्तीचेच काम सुरू होते. जलवाहिनीची तात्काळ दुरूस्ती करण्यात आली असून सदरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×