दाभोळकर प्रकरणातील आरोपी विक्रम भावे विरोधात दोषारोपपत्रासाठी मुदतवाढ

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विक्रम भावे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला. मागील आठवड्यात न्यायालयाने भावे याचा जामीन अर्जही फेटाळला होता.

या प्रकरणाचा तपास प्रगती पथावर आहे. पुरावे गोळा करणे आणि इतर तपासासाठी वेळ आवश्‍यक असल्याने न्यायालयाने ही मुदतवाढ दिली आहे. भावे याच्या अटकेला 23 ऑगस्ट रोजी 90 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयचे तपास अधिकारी आस. आर. सिंग आणि सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली होती. या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

ऍड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी पुनाळेकर यांना अटक केली आहे. याबरोबरच तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×