मुंबई – तब्ब्ल साडे आठ तासांच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी कोणताही संवाद साधला नाही. सकाळी 11:30 वाजता राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते.
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणी राज ठाकरे यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. ईडीच्या तीन अधिकाऱ्यांसमोर राज ठाकरे यांची कसून चौकशी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असून त्यांची चौकशी संपेपर्यंत त्यांचे कुटुंबिय ईडी कार्यालयाजवळच असलेल्या ‘ग्रँड’ हॉटेलमध्ये थांबले होते.