अ हमद खानद्वारा दिग्दर्शित साजिद नाडियादवाला यांच्या “हिरोपंती’च्या सीक्वलचे मार्च महिन्यात मुंबईत एक छोटेशे शेड्यूल सुरू करण्यात आले होते. यानंतर आता संपूर्ण टीम ही दुसरे शेड्यूल शूट करण्यासाठी रशियाला जाण्याची तयारी करत आहे.
View this post on Instagram
“हीरोपंती-2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. ही संपूर्ण टीम पुढील महिन्यात मॉस्कोला जाणार आहे. त्यानंतर ते रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे चित्रीकरण करणार आहेत.
View this post on Instagram
मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे चित्रपटातील प्रमुख ऍक्शन सीन आणि एक गाणे शूट करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. रशियातील काही स्थानिकांशी संपर्क करून तेथील काही परफेक्ट लोकेशन शोधण्यात येत आहे. तसेच लार्जर दॅन लाइफ ऍक्शन दृश्य चित्रित करण्यासाठी काही स्टंट डिझायनर यांच्याशीही चर्चा करण्यात येत आहे.
View this post on Instagram
यापैकी एक मार्टिन इव्हानो हे आहेत. त्याने “स्काईफॉल’ (2012), “द बॉर्न अल्टीमेटम’ (2007) आणि “द बॉर्न सुपरमेसी’ (2004) या सुपरहिट चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर रशियाला जाण्यापूर्वी “हिरोपंती-2’च्या टीममधील सर्व क्रू मेंबर्सचे लसीकरण करून घेण्याचे साजिद नाडियादवाला यांनी सुनिश्चित केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, “हिरोपंती’मधून नाडियादवाला यांनी टायगर श्रॉफला बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमविला होता. या चित्रपटातील टायगरच्या ऍक्शन सीनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा “हिरोपंती-2’मध्ये त्याच्या स्टायलिश ऍक्शन चाहत्यांना पाहावयास मिळणार आहेत.