मुंबई – अहमद खानद्वारा दिग्दर्शित साजिद नाडियादवाला यांच्या “हिरोपंती’च्या सीक्वलचे पोस्टर आऊट झाले आहे. “हीरोपंती-2’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील मुख्य भूमिका साकारत आहे.
TIGER SHROFF: ‘HEROPANTI 2’ CONFIRMS EID 2022 RELEASE… #SajidNadiadwala is bringing #Heropanti2 – starring #TigerShroff and #TaraSutaria – on #Eid 29 April 2022 … Directed by #AhmedKhan… NEW POSTER… pic.twitter.com/OgoU5hUcnT
— taran adarsh (@taran_adarsh) February 12, 2022
या चित्रपटाच्या चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटाचं पोस्टर टायगर श्रॉफ शेअर केले आहे. याचबरोबर 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या दिवशी सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
“हिरोपंती’मधून नाडियादवाला यांनी टायगर श्रॉफला बॉलीवूडमध्ये लॉन्च केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमविला होता. या चित्रपटातील टायगरच्या ऍक्शन सीनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा “हिरोपंती-2’मध्ये त्याच्या स्टायलिश ऍक्शन चाहत्यांना पाहावयास मिळणार आहेत.