मुंबई : अभिनेता सलमान खाननेही लसा मंगेशकर यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने व्हिडीओही शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दबंग खानने ‘लग जा गले’ गाणे गायले आहे.
6 फेब्रुवारी रोजी भारतीय बॉलीवूड सह देशाने एक रत्न गमावले, भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. देश अजूनही निधनावर शोक व्यक्त करत आहे त्यांच्याच आठवणीत सुपरस्टार सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर गाणं म्हणत श्रद्धांजली वाहिली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘लग जा गले’. “लताजी तुमच्यासारखे कधीच नव्हते, कधीही होणार नाही…,” असे कॅप्शन दिले.
दरम्यान, लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार सुरू होते. याच रुग्णालयात त्यांचं निधन झालं.