मुंबई – मुंबईसह कोकणामध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अशातच आज प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या माहितीनुसार, मुंबई व ठाणे येथे १२ व १३ जूनला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे.
तर प्रादेशिक हवामान केंद्राने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये १२, १३ व १४ जूनला अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra’s Mumbai, Raigad, Ratnagiri districts very likely to receive extremely heavy rainfall on 13th and 14th June: Regional Meteorological Centre, Mumbai pic.twitter.com/uZUXQ4i8TI
— ANI (@ANI) June 12, 2021