पटना – लग्न म्हणलं की रुसवे-फुगवे होत असतात. मात्र बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्याचील भोरे पोलीस ठाण्यातअंतर्गत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे लग्न सोहळ्यात जेवणादरम्यान झालेल्या मारहाणीत तब्बल 11 जणं जखमी झाले आहेत.
येथे लग्न समारंभादरम्यान माशाच्या तुकड्यासाठी (माशाचे डोके) मोठी मारहाण झाली. या मारहाणीच्या घटनेत तब्बल 11 जणं जखमी झाले आहेत. ही घटना बिहारमधील गोपाळगंज जिल्ग्यातील भोरे पोलीस ठाणे हद्दीतील सिसई टोला भटवलिया येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर जेवणादरम्यान माशाच्या डोक्याचा तुकडा वाढला नाही म्हणून मारहाण झाली. या घटनेत दोन्ही पक्षातील 11 लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोरे रेफरल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही पक्षातील जखमींचा जबाब नोंदवून घेतला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
लग्न समारंभात छोटी-मोठी भांडणं होत असतात, मात्र माशाच्या तुकड्यासाठी या लग्नात तर राडाच झाला.