Heat Wave । मागील काही दिवसांपासून देशातील वातावरणात थंड-गरम असा बदल झालेला दिसून येतोय. त्यातच कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान राज्यात पुढील 24 तासासाठी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलाय. तर दुसरीकडे आज कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.
मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेची लाट Heat Wave ।
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून उत्तर कोकणासाठीचा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. तर आज ठाणे, मुंबई, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
घराबाहेर पडताना काळजी घ्या Heat Wave ।
पुढील 24 तासात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या देखील उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर कोकणात कमाल तापमान 40 च्या पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात पावसाची शक्यता
पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.