आळंदी – करोनाच्या पार्श्वभूमीवर कमलेश ऑटो युवामंचच्या वतीने गेल्या 15 दिवसांमध्ये 10 ते 15 हजार गरजूंना अन्न वाटप करण्यात आले. तर रविवारी (दि. 17) 800 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर भारतीय जैन संघटना यांनी रुग्णवाहिका, पीपीई कीट व गोळ्या-औषधे देऊन मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती युवामंचचे प्रमुख संदीप भसे यांनी दिली.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देहुफाटा, काळेवाडी, काळे कॉलनी, तापकीरनगर, इंद्रायणीनगर, चऱ्होली भागातील जनतेची व अनेक कामगारांची, मोलमजुरी करणारे, बेघर तसेच भाडेकरी गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. तर रविवारी आरोग्य तपासणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
यावेळी मयूर मोहिते, नगरसेविका विनया तापकीर, अजित काळभोर, भारत सातपुते, डॉ. सुनील जगताप, अशोक रहाणे, हर्षल बोरुडे, खुशाल तापकीर, अतुल तापकीर, शुभम वेळकर, प्रमोद पऱ्हाड, निखील पिंजण, अमोल ढेरंगे, हर्षल पारवे, आसावरी भसे, संजीवनी सस्ते, सपना लांडगे तसेच युवा मंचचे सर्व कार्यकर्ते नागरिकांची सेवा करीत आहे.