मुंबई – अभिनेत्री ‘प्रार्थना बेहेरे’ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रार्थनाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
अभिनया बरोबरच प्रार्थना सोशल मीडियावर सुद्धा चांगलीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देते.
नुकतंच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले असून, तिचा हा मराठमोळा लूक पाहून सारेच तिच्यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली आणि मोकळे सोडलेले केस आणि हिरव्या बॉर्डरची साडी असा सुंदर लूक प्रार्थनानं केला आहे.
दरम्यान, तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.