Haryana Steelers vs Patna Pirates, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्स संघाने पाटणा पायरट्स संघाचा ३९-३२ अशा फरकाने पराभव केला. या सामन्यात सिद्धार्थ देसाई हरियाणा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह हरियाणा स्टिलर्स संघाने प्लेऑफचे तिकीट मिळविले आहे.
अपने घर पर हरियाणा का हल्ला बोल 💪#PatnaPirates को हराकर हासिल किया प्लेऑफ़ का टिकट 💥#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvPAT #HaryanaSteelers pic.twitter.com/7UGDWw1U4M
— ProKabaddi (@ProKabaddi) February 16, 2024
सामन्याचे पहिल सत्र दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दिलेल्या कडव्या लढतीने गाजले. या सत्रात हरियाणा संघान पाटणा संघाला तुल्यबळ लढत दिली. पाटणा संघाचा स्टार खेळाडू अनुज कुमार व रोहित यांनी अफलातून पकडी केल्या मात्र, हरियाणा संघाच्या जयदीप दहिया व सिद्धार्थ देसाई यांनीही तोडीस तोड खेळ करत आपणही कुठे कमी नाही हेच दाखवून दिले.
या सत्रात पाटणा संघाकडून अनुजने ४ तर रोहितने ३ गुणांची कमाई केली. हरियाणाकडून कर्णधार दहियाने ३ गुण तर सिद्धार्थ देसाईने २ गुणांची कमाई केली. पहिले सत्र संपले तेव्हा दोन्ही संघांची १३-१३ अशी बरोबरी झाली होती.
या स्पर्धेत यंदाच्या मोसमात पाटणा संघाने गुणतालिकेत चौथे स्थान प्राप्त करत बाद फेरी यापूर्वीच निश्चित केली आहे. हरियाणा संघालाही अजून बाद फेरीच्या आशा कायम असल्याने आगेकूच करण्याची संधी आहे. दुसरे सत्र सुरु झाल्यावरही या दोन संघातील चुरस कमी झाली नाही. एकवेळ पुन्हा २५-२५ अशी बरोबरी झाली होती व सामन्याची काही मिनिटेच बाकी होती. त्यातही सामन्याला कलाटणी मिळाली व हरियाणाने बाजी पलटवली. अखेरच्या तीन मिनिटांत त्यांनी सर्वोत्तम पकडी केल्या तसेच रेड गुणांतही बाजी मारली.