Puneri Paltan vs Haryana Steelers, Pro Kabaddi League 2024 :– प्रो-कबड्डी लीगमध्ये आज (शुक्रवार) पुणेरी पलटण व हरियाणा स्टिलर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
उपांत्य फेरीत्या लढतींत पुणेरी संघाने पाटणा पायरट्सचा पराभव केला तर हरियाणा स्टिलर्सने जयपुर पिंक पॅंथर्सवर विजय मिळवताना अंतिम फेरी गाठली. आता या दोन संघातील विजेता यंदाच्या स्पर्धेचा करंडक उंचावणार आहे.
After 3️⃣ months of power-packed and high-octane action, the 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐏𝐀𝐍𝐆𝐀 of #PKLSeason10 is now here 😎🔥 pic.twitter.com/EamMrFfKCL
— ProKabaddi (@ProKabaddi) March 1, 2024
पुणेरी संघाने आतापर्यंतच्या वाटचालीत २२ पैकी १७ सामने जिंकले. त्यांनी २ सामना गमावले तर ३ सामने बरोबरीत सुटले. त्यांनी गुणतालिकेत ९६ गुण मिळवत अव्वलस्थान मिळवले. दुसरीकडे हरियाणाने यंदाच्या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानला जात असलेल्या जयपुर पिंक पॅंथर्सचा पराभव केला व थाटात अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेत नावाजलेल्या संघांना महत्वाच्या सामन्यांत पराभवांचा सामना करावा लागल्याने अंतिम फेरी गाठता आली नाही. दबंग दिल्ली, जयपुर, पाटणा व गुजरात जायंट्स हे चार संघ उपांत्य फेरी निश्चित गाठलीत असे मानले जात होते. मात्र, त्यांना साफ निराशा सहन करावी लागली. आता पुणेरी पलटण व हरियाणा या तोलामोलाच्या संघात अंतिम लढत रंगणार असून दोन्ही संघांचे बलाबल पाहता पुणेरी पलटणला विजेतेपदाची जास्त संधी आहे.