Puneri Paltan vs Haryana Steelers, Pro Kabaddi League 2024 Final : पुणेरी पलटणने इतिहास रचला आहे आणि प्रो कबड्डीच्या 10व्या हंगामाचे (पीकेएल 10) विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी रोमहर्षक अंतिम सामन्यात हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव केला आणि प्रथमच चॅम्पियन बनण्यात यश मिळविले. हरियाणाचा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ आला होता, पण शेवटी त्यांचा विजय थोडक्यात हुकला.
Puneri Paltan crowned champions of #PKLSeason10 🤩
The Paltan beat the Steelers to secure their maiden #PKL 🏆#ProKabaddi #ProKabaddiSeason10 #PKL10 #PKLSeason10 #PKLFinal #HarSaansMeinKabaddi #PUNvHS #PuneriPaltan #HaryanaSteelers pic.twitter.com/edoZkX23ZW
— ProKabaddi (@ProKabaddi) March 1, 2024
पुणेरी पलटण पहिल्या मोसमापासून या लीगचा भाग आहे आणि 10 हंगाम, 10 वर्षे आणि सुमारे 200 सामने खेळल्यानंतर PKL 10 मध्ये चॅम्पियन बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
पुणेरी पलटणचे प्रो कबड्डी लीगचे हे पहिले विजेतेपद ठरले. उपांत्य फेरीतील लढतींत पुणेरी संघाने पाटणा पायरट्सचा तर हरियाणा स्टिलर्सने जयपुर पिंक पॅंथर्सवर विजय मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. पीकेएलमध्ये अंतिम फेरीत पुणेरी पलटणने दुसऱ्यांदा तर हरियाणा स्टीलर्सने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
First times are always special ❤
Puneri Paltan celebrate clinching their maiden #PKL 🏆#ProKabaddi #ProKabaddiSeason10 #PKLFinal #PKL10 #PKLSeason10 #PKLFinal #HarSaansMeinKabaddi #PUNvHS #PuneriPaltan #HaryanaSteelers pic.twitter.com/LK0jmVKdOl
— ProKabaddi (@ProKabaddi) March 1, 2024
पूर्वार्धानंतर पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सविरुद्ध 13-10 अशी आघाडी घेतली. पुणेरी पलटणने सामन्याची सुरुवात चांगली केली. प्रथम त्याने शिवमला टॅकल केले, नंतर मोहित गोयतने मोहित नंदलला टच केले आणि अबिनेशने विनयला टॅकल केले आणि हरियाणा स्टीलर्सवर पूर्ण दबाव आणला. सहाव्या मिनिटाला मोहित गोयतने केलेल्या टॅकलने स्टीलर्सने आपले खाते उघडले. यानंतर शिवमनेही चढाई करताना गुण मिळवण्यात यश मिळविले. इथून सामन्याचा वेग बराच मंदावला आणि दोन्ही संघांनी करा किंवा मरोच्या चढाईवर खेळणे चांगले मानले.
दरम्यान, 19व्या मिनिटाला पंकज मोहितेने जबरदस्त सुपर रेड करत हरियाणाच्या 4 खेळाडूंना बाद केले आणि येथून पलटणला गती आली. विशालने एकदा बोनससह टच पॉइंट मिळवून संघाला ऑलआऊटपासून वाचवले. पूर्वार्धाच्या शेवटच्या चढाईत आशिषनेही टच पॉइंट आणून अंतर कमी केले.
पुणेरी पलटणने दुसऱ्या हाफची शानदार सुरुवात केली आणि सामन्याच्या 24व्या मिनिटाला हरियाणा स्टीलर्सला ऑलआऊट करून सामन्यातील आघाडी मजबूत केली. स्टिलर्सच्या रेडर्सनी त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा बचाव 20व्या ते 30व्या मिनिटापर्यंत पूर्णपणे फसला आणि त्यामुळेच पलटणला आपली आघाडी कायम ठेवण्यात यश आले. हरियाणाच्या बचावफळीने 36व्या मिनिटाला उत्तरार्धात पहिला गुण मिळवला.
सरतेशेवटी, हरियाणाने अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पुरेसा झाला नाही आणि या थरारक अंतिम फेरीत त्यांचा पराभव झाला. पुणेरी पलटणने इतिहास रचला असून प्रथमच पीकेएलचे विजेतेपद पटकावले आहे.