Bengal Warriors vs Puneri Paltan, Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये, पुणेरी पलटणने 10 व्या हंगामात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. नेताजी इनडोअर स्टेडियमवर बुधवारी झालेल्या मोसमातील 121व्या सामन्यात पुणेरी संघाने बंगाल वॉरियर्सचा 29-26 असा पराभव केला. या पराभवानंतर बंगालचा प्लेऑफचा मार्ग खडतर झाला आहे.
Some Paltan power to cap off the action in Kolkata 🔥
Akash Shinde shone with a Super 10 as Puneri Paltan edged hosts Bengal Warriors by 3️⃣ points 👏#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #BENvPUN #BengalWarriors #PuneriPaltan pic.twitter.com/6cHIP0UvLw
— ProKabaddi (@ProKabaddi) February 14, 2024
पुणेरीने 20 सामन्यांमध्ये 15व्या विजयानंतर 86 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर बंगाल वॉरियर्सला 21 सामन्यांमधला 10वा पराभव पत्करावा लागला असून आता संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. बंगाल अजूनही सातव्या स्थानावर आहे. सातव्या मोसमातील चॅम्पियन संघ बंगाल वॉरियर्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता, परंतु घरच्या मैदानातील शेवटच्या सामन्यात पराभवाचा मोठा फटका त्यांना बसला आहे. या पराभवामुळे त्यांच्या PKL 10 मधून बाहेर पडण्याची अपेक्षा खूप वाढली आहे.
पुणेरी पलटणसाठी PKL 10 च्या या सामन्यात, आकाश शिंदेने सुपर 10 लगावताना सर्वाधिक 10 रेड पॉइंट घेतले. आणि बचावात, अबिनेश नादराजनने सर्वाधिक 4 टॅकल पॉइंट घेतले. बंगाल वॉरियर्ससाठी, चढाईत नितीन कुमारने सर्वाधिक 5 रेड पॉइंट घेतले आणि बचावात शुभम शिंदे आणि वैभव गर्जे यांनी प्रत्येकी दोन टॅकल पॉइंट घेतले.
#PKLSeason10 ( #DELvCHE Match 120 ) : रोमहर्षक लढतीत दिल्लीचा तमिळ थलायवाजवर ‘दंबग’ विजय…
पलटनने 18-9 अशा गुणांसह नऊ गुणांची आघाडी घेत पहिला हाफ संपवला. त्यानंतर सामना संपायला फक्त दोन मिनिटे बाकी होती आणि पुणेरी संघ 28-23 असा पाच गुणांनी पुढे होता. दरम्यान, आकाश शिंदेने सुपर-10 लगावत बंगालसाठी पुनरागमनाचे दरवाजे बंद केले. यासह पुणेरी पलटणने 29-26 असा सामना जिंकला.