PKL 2024 Final Match Haryana Steelers vs Puneri Paltan : प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या अंतिम फेरीत शुक्रवारी पुणेरी पलटणचा सामना हरयाणा स्टीलर्सशी होणार आहे. पुणेरी पलटणने बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीत पाटणा पायरेट्सचा 37-21 अशा गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. गेल्या मोसमात त्यांना मुंबईत जयपूर पिंक पँथर्सकडून पराभव पत्करावा लागला होता.
पुणेरी पलटणने या मोसमात खेळल्या गेलेल्या 23 सामन्यांत 18 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, हरियाणा स्टीलर्सने उपांत्य फेरीत गतविजेत्या जयपूरचा 31-27 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. PKL 2024 मध्ये, स्टीलर्सने 24 सामने खेळताना 15 मध्ये विजय संपादन केला आहे. तर सामने 8 गमावले आहेत आणि एक बरोबरीत आहे.
पीकेएलचे पहिले विजेतेपद जिंकण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. अशा परिस्थितीत आपण हा अंतिम सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकतो हे जाणून घेऊया….
PKL 2024 ची फायनल कधी खेळली जाईल
PKL 10 चा अंतिम सामना पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात 1 मार्च म्हणजेच आज होणार आहे.
PKL 10 चा अंतिम सामना कुठे खेळला जाईल?
पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यातील PKL 10 अंतिम सामना हैदराबादच्या गचीबौली येथील GMC बालयोगी क्रीडा संकुलात खेळवला जाईल.
अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?
पुणेरी पलटन आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यातील PKL 10 अंतिम सामना भारतीय वेळेनुसार (IST) रात्री 08:00 वाजता सुरू होईल.
पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स (हेड-टू-हेड रेकॉर्ड)
खेळलेले सामने : 14, पुणेरी पलटणने जिंकले : 8, हरियाणा स्टीलर्सने जिंकले : 5, बरोबरी: 1
PKL 2024 अंतिम थेट प्रसारण कसे पहावे
पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स PKL 2024 ची अंतिम फेरी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर हा सामना पाहू शकता.
We didn’t overhear the conversation, we just recorded it 😅🤷♂️
Catch them in the #Final panga tonight at 7:30 PM, LIVE on the Star Sports Network and for free on Disney+ hotstar mobile app 📱#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PKLFinal #PUNvHS pic.twitter.com/SMsnc1pVR3
— ProKabaddi (@ProKabaddi) March 1, 2024
PKL 2024 फायनल लाइव्ह स्ट्रीम कुठे पाहता येईल
पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टीलर्स यांच्यातील PKL 2024 ची अंतिम फेरी Disney+ Hotstar ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह-स्ट्रीम केली जाईल.
#PKLSeason10 #Final : पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात आज होणार विजेतेपदाची लढत….
दोन्ही संघांचे स्क्वाड खालीलप्रमाणे –
पुणेरी पलटन टीम : अभिनेश नादराजन, गौरव खत्री, संकेत सावंत, पंकज मोहिते, असलम इनामदार, मोहित गोयत, आकाश शिंदे, बादल सिंह, आदित्य शिंदे, मोहम्मदरेजा शादलूई चियान्नेह, वाहिद रेजाइमर, अहमद मुस्तफा इनामदार, ईश्वर, हरदीप.
हरियाणा स्टीलर्स टीम : चंद्रन रंजीत, के प्रपंजन, सिद्दार्थ देसाई, विनय, तेजस पाटिल, शिवम पटारे, विशाल टेट, घनश्याम मगर, हसन बलबूल, हरदीप, जयदीप दहिया, राहुल सेठपाल, रवींद्र चौहान, मोहित नंदल, मोनू हुडा, नवीन कुंडू, हर्ष, सनी सहरावत, मोहित, हिमांशु चौधरी, आशीष.