Aslam Inamdar Biography in Marathi | पुणेरी पलटणने प्रथमच पीकेएल सीझन 10 चे विजेतेपद पटकावले आहे. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू अस्लम इनामदार संपूर्ण हंगामात त्याच्या संघासाठी हिरो राहिला. प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब पटकावणारा पुणेरी पलटणचा युवा खेळाडू अस्लम इनामदारचा प्रवास मात्र सोपा राहिलेला नाही.
अस्लम इनामदार हा एक भारतीय कबड्डी खेळाडू आहे. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 2000 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान नावाच्या गावात झाला. अस्लमचे सुरुवातीचे आयुष्य आव्हानांनी भरलेले होते. 2011 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याचे जगणे आणखी कठीण झाले होते.
त्याच्या मोठ्या भावाचे नाव वसीम इनामदार असून अस्लमने मोठ्या भावाला पाहून कबड्डी खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला वसीम त्याला रागवयाचाआणि अभ्यासात लक्ष घालायला सांगायचा. कारण या कठीण प्रसंगातून शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, अशी कुटुंबाची समजूत होती.
पीकेएलच्या आधी अस्लम इनामदार याचा संघर्ष…
अस्लम याने संघर्षांच्या शाईने स्वतःची यशाची कहाणी लिहिली आहे. अस्लम लहानपणी गावच्या मातीत कबड्डी खेळायचा. अस्लम सांगतो की, लहानपणी त्याची आई इतर लोकांच्या घरी जाऊन भांडी धुत असे. आणि त्याचा मोठा भाऊ वसीम कॉलेजमध्ये माळी म्हणून काम करत असे आणि कामावरून परत आल्यावर कबड्डी खेळत असे. अस्लमही चहाच्या दुकानातही काम करत होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घर चालवण्यासाठी काही ना काही काम केले. सुरुवातीला अस्लमचे कुटुंब भाड्याच्या कच्च्या घरात राहत होते. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अस्लमने संघर्षमय परिस्थितीत स्वत:च्या हिमंतीवर यशाचं शिखर गाठलं आहे.
पुढे अस्लमच्या मोठ्या भावाला पोलीस खात्यात नोकरी लागल्याने त्यांचा काळ बदलला आणि अस्लमला कबड्डी खेळण्याची उत्तम संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अस्लम सुरुवातीला आपल्या भावाच्या मित्रांसोबत कबड्डी खेळू लागला. हळूहळू त्याच्या खेळात सुधारणा होऊ लागली आणि त्याची गावाच्या संघात निवड झाली. अस्लमने स्थानिक स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली ज्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे लोक त्याच्याबद्दल बोलू लागले आणि तो चर्चेत आला.
त्या काॅलने आयुष्यच टाकले बदलून …
एके दिवशी अस्लमला एक फोन आला ज्याने अस्लमचे आयुष्यच बदलून टाकले. हा कॉल ठाण्यातील अरुण म्हात्रे सरांचा होता, ज्यांनी अस्लमला एअर इंडिया संघाच्या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याचे सुचवले. हे प्रशिक्षण 10 दिवस चालले आणि अस्लमला संघात स्थान मिळवता आले नाही. कारण त्यावेळी अजय ठाकूर, दीपक निवास हुडा आणि राहुल चौधरीसारखे मोठे खेळाडू एअर इंडियाच्या कबड्डी संघात खेळायचे. पण अस्लम नियमितपणे सराव सत्रात सहभागी होत असल्याने एअर इंडिया संघाचे प्रशिक्षक अशोक शिंदे यांचे लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी झाला. आणि प्रशिक्षकाने अस्लमचा एअर इंडिया संघात मुख्य रेडर म्हणून समावेश केला. संधी मिळाल्यानंतर मग अस्लम एअर इंडिया संघाकडून सलग 3 वर्षे खेळला.
PKL सीझन 8 मध्ये केलं पदार्पण…
PKL सीझन 8 मध्ये पुणेरी पलटणमध्ये त्याची पहिल्यांदा निवड झाली होती जिथे त्याने आपल्या चमकदार रेडिंग टाकण्याचे कौशल्य आणि बचावात्मक कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याने पुणेरी पलटणसाठी पदार्पणाच्या मोसमात एकूण 220 गुण मिळवले होते. यापैकी 169 गुण रेड (छापा) टाकताना तर उर्वरित 51 गुण डिफेंस (बचाव) करताना आले. तो PKL 9 मधील पुणेरी पलटणसाठी सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक आहे, त्याने संघाला PKL 9 च्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचविण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले होते.
#PKLSeason10 #Final #PUNvHS : पुणेरी पलटणचे स्वप्न झाले साकार, विजेतेपद पटकावत रचला इतिहास…
अस्लम इनामदारचे नेट वर्थ…
अस्लम इनामदार याचा पगार 10 लाख रुपये (अंदाजे) आहे. त्याच्या युवा पलटण संघात, तो PKL लिलावात सर्वात महागडा खेळाडू आहे. हा पगार प्रो कबड्डी लीगच्या कोट्यात MVP आणि प्रति सामना पगारासह समाविष्ट आहे. अस्लम हा युवा पलटण संघाचा सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. पुणेरी पलटणने त्याला यंदाही कायम ठेवले आहे. स्पोर्ट्स सिम कार्डच्या अहवालानुसार, 24 वर्षीय रेडरची एकूण संपत्ती सुमारे 50 लाख रुपये आहे.
पीकेएल 10 मध्ये पटकावला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब….
आपल्या चमकदार कामगिरीमुळे अस्लमने आपल्या संघ पुणेरी पलटणला पहिले विजेतेपद पटकावण्यास मदतच केली नाही तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताबही जिंकला. यासाठी अस्लम इनामदार याला 20 लाखांचे बक्षीस मिळाले आहे.