पुणे – पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी एका दुकानदाराला खडकी पोलिसांनी अटक केली. साहिल अरविंद परदेशी (वय. 31, रा. बोपोडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी डी. आर. लोणकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणकर हे करोना संसर्गाच्या अनुषंगाने बंदोबस्तावर होते. त्यावेळी आरोपी परदेशी याचे चिकनचे दुकान निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असल्याचे त्यांना आढळले. त्यानुसार त्यांनी त्याला दुकान बंद करण्यस सांगितले.
मात्र, आरोपीने “तुम्ही कोण मला दुकान बंद करण्यास सांगणारे, तुम्ही कोणीही असलात तरी मला फरक पडत नाही मी दुकान बंद करणार नाही’ असे म्हणत लोणकर यांच्या तोंडावर ठोसा मारला. तसेच इतर दोघांनी देखील त्यांना धक्काबुक्की केली. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल भोसले करत आहेत.