केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलु जॅक कॅलिसने क्रिकेटच्या माध्यमातून सामाजीक संदेश देण्यासाठी तसेच काय सांगतो ते लोकांना कळावे यासाठी अर्धी दाढी ठेवली आहे. उत्सुकतेपोटी लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात व त्याचवेळी तो प्रत्येकाला संदेश देतो.
कॅलिसबाबत दक्षिण आफ्रिकेत प्रचंड आदर आहे. त्याने देशासाठी केलेले अनेक विक्रम आजही आबाधीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी तो एका सामाजीक संस्थेशी जोडला गेला आहे. कॅलिसने देशातील गेंड्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, शिकारी गेंड्याच्या कातडी व हाडांची तस्करी करतात त्यामुळे एकेकाळी वनक्षेत्राची शान असलेला हा प्राणी नामशेष होऊ नये यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे.
त्याचसाठी सगळेच प्रयत्न गंभीर चेहरा ठेवुनच केले पाहीजेत असे नाही तर मजेशिर पद्धतीनेही लोकांपर्यंत संदेश पोचोवला जाऊ शकतो. त्याचसाठी लोकांचे माझ्याकडे लक्ष जावे म्हणूनच मी अर्धी दाढी ठेवली आहे, व मला त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे कॅलिसने सांगितले.