पुणे: हॉटफुट स्पोर्टस अकादमी आयोजित पाचव्या वर्षी अपोलो हॉटफुट युवा साखळी आंतर अकादमी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात फाल्कन्स् फुटबॉल अकादमी संघाने मेगा प्रो संघाचा दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात फाल्कन्स् एफए संघाने मेगा प्रो संघाचा 11-0 असा धुव्वा उडविला. फाल्कन्स संघाकडून साई पाटील आणि ऋषभ राज यांनी प्रत्येकी 3 गोल केले. रिधान चौधरी याने 2 गोल करून संघाला सहज मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात फाल्कन्स संघाने जेएन पेटीट संघाचा 4-1 असा सहज पराभव केला.
याच गटाच्या इतर सामन्यात 4 लायन्स अकादमी संघाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. 4 लायन्स संघाने दिएगो ज्युनिअर्स फुटबॉल अकादमी अ संघाचा 7-3 असा पराभव केला. यानंतर, 4 लायन्सने रॉयल एफसीचा 7-4 असा फरकाने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात 4 लायन्स अकादमीने फाल्कन्स एफएचा 3-1 असा पराभव केला. इंदिरा अकादमीने सलग दोन विजयांची नोंद केली. सिध्देश ठागेच्या गोलांच्या जोरावर रॉयल एफसीने जेएन पेटीट संघाचा 2-0 असा पराभव केला.
8 वर्षाखालील गटात नाझ फुटबॉल अकादमी अ संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. याबरोबरच आयएफा, फन फिटनेस, 4 लायन्स अकादमी आणि ईएनएनएस बोर्डींग या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांविरूध्द विजय मिळवत आगेकूच केली