बंगळुरु :- भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला तब्बल 37 वर्षांनंतर देशातील पहिल्या क्रमांकाची खेळाडूची जागा सोडावी लागत आहे. आनंदच्याही गुणांना मागे टाकत भारताचा नवोदित ग्रॅंडमास्टर डी गुकेश आता पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे.
वयाच्या केवळ 17 व्या वर्षी गुकेशने ही कामगिरी केली आहे. आनंदने तीन दशकांपेक्षा जास्त काळ अव्वल स्थान राखले होते. 1986 सालच्या जुलै महिन्यापासून देशात अव्वल स्थानी होता.
अझरबैजान येथे झालेल्या बुध्दीबळ विश्वकरंडक स्पर्धेत गुकेशने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तरीही तो क्रमवारीत आनंदच्या पुढे गेला व जगात 8 व्या क्रमांकावर पोहोचला.
आता ताज्या क्रमवारीत त्याने जागितक स्तरावर टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. क्रमवारीत आता गुकेशचे 2758 तर आनंदचे 2754 गुण आहेत.