मुंबई – आज २०१९ या वर्षातील अखेरचा दिवस असून जगभरामध्ये आजचा थर्टीफस्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी तसेच नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असल्याने डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिरकताना दिसणार आहे. अशातच आता महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक पार्ट्यांमध्ये मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी बी राजपूत यांनी सांगितले की, गतवर्षी नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ६९१ पार्ट्यांमध्ये मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली होती मात्र यंदा हा आकडा ७१५ एवढा वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, आजच्या दिवशी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून देशभरातील विविध शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर देखील पोलिसांची करडी नजर असून मद्यपान करून वाहन न चालवण्याचा संदेश पोलिसांमार्फत देण्यात आला आहे.
CB Rajput, Superintendent of Maharashtra Excise Department, Mumbai: Last year we had issued 691 liquor licenses for parties (on new year’s eve), this year it has increased to 715. #NewYear pic.twitter.com/QEfkstoUO2
— ANI (@ANI) December 31, 2019