पुणे -पूना क्लब यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी करंडक सांघिक गोल्फ स्पर्धेत इक्रम खान, ललित चिंचाळकर, गौरव गढोके आणि दीपा धानी यांचा समावेश असलेल्या गोल्फ क्लब संघाने विजेतेपद संपादन केले. या संघाने सर्वाधिक एकूण 160 गुणांची नोंद केली.
संपूर्णपणे नव्या फॉरमॅटचा समावेश असलेल्या या सांघिक स्पर्धेत एकूण 92 गोल्फपटूंनी सहभाग नोंदविला होता.
ललित चिंचाळकर यांनी विजेत्या गोल्फ क्लब संघांचे कर्णधारपद भूषविले. उपविजेत्या संघात जयंत थोरात, भक्ती थोरात, नितीन लुंकड, संग्राम किर्लोस्कर यांचा समावेश असून त्यांनी 102 गुणांची नोंद केली.
तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या संघात राघव अगरवाल, मि कीओंग, अनुज धोडी, दीपक सूद यांचा समावेश असून त्यांनी 97 गुणांची कमाई केली.