हरियाणा – चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्य पदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. आकांक्षाने तीन सेटमध्ये (6-7, 7-6 व 6-4) हा सामना जिंकला.
पंचकुलातील जिमखाना मैदानावर ही चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये कर्नाटकच्या मुयरीने आघाडी घेतली होती. पहिले चार गुण मिळवल्यानंतर तिने सामन्यावर पकड बनवली. परंतु आकांक्षाने 4-4 आणि 5-5, 6-6 अशी बरोबरी साधली. परंतु ऐनवेळी मुयरीने गुण घेत पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही पहिले पाच गुण घेऊन मयुरी पुढे होती. परंतु आकांक्षाने नंतर गिअर बदलला. फोरहॅंड, बॅकहॅडचे फटके मारून तिने गुण घेण्यास सुरूवात केली. सहा-सहा गुण बरोबरी झाली. नंतर आकांक्षाने एक गुण घेत दुसरा सेट (7-6) जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली. नेहमीप्रमाणे तिसऱ्या सेटमध्ये मयुरी आघाडीवर राहिली.
पुण्याच्या वैष्णवीला कांस्य
मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राला कांस्यपदक सहजपणे पदक मिळाले. पुण्याच्या वैष्णवी आडकर आणि हरियानाच्या श्रृती अहलावत यांच्यात कांस्य पदकासाठी सामना होता. परंतु या सामन्यात श्रृती गैरहजर राहिली. त्यामुळे वैष्णवी कांस्यपदकाची मानकरी ठरली.
पहिले चार गुण घेत तिने आकांक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आकांक्षा दोन गुणांवर होती. तेव्हापासून खेळाचा नूर पालटला. दोघीही एकेका गुणांसाठी झगडत होत्या. त्यांना प्रत्येकी तीन ऍडव्हान्टेज मिळाले. परंतु तिसरा महत्त्वाच पॉईंट ही आकांक्षानेच घेतला. चौथाही गुण सहज घेतला. चार-चार अशी बरोबरी झाल्याने मयुरी बॅकफूट गेल्याचे दिसून आले. पाचवा गुणही आकांक्षानेच घेतला. दबावात आलेल्या मयुरीवर तिने पुन्हा एक महत्त्वपूर्ण गुण घेत सामना तिसऱ्या सेटमध्ये (6-4) जिंकला.