वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली परिसरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरलेली भव्य क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शांताराम बापू कटके व वाघोली सोसायटी क्रिकेट कौन्सिल यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
व्हॅलेंटाईन कप नावाने झालेल्या स्पर्धेला नागरिक, सोसायटी संघ व सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी 50 सोसायट्यांमधील 32 संघांनी खेळात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. अटीतटीच्या लढती व रोमांचक सामान्यांनी नागरिकांचे चांगलेच मनोरंजन केले.
स्पर्धेच्या या 6व्या पर्वासाठी विविध संघांनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्व खेळाडूंना आयोजकांच्या वतीने ट्रॅक सूट, टोपी, नाश्ता पाणी व भेटवस्तू पुरवण्यात आल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आपल्या उत्कृष्ट खेळाने निओ सिटी रॉकस्टार, सुयोनी निसर्ग क्रिकेट क्लब, सवाना सोसायटी टायटन्स व मयुरी इनक्लेव रायडर्स या संघांनी अनुक्रमने प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला.
या सोहळ्यासाठी शांताराम बापू कटके, सोमनाथ आव्हाळे, सोमनाथ कटके, शनिभाऊ शिनगारे, किरण मनकवले, विलास दोरगे, सदानंद थोरात, विजय शेट्टी, आकाश सोनवणे, अतुल हंडाळ, रामभाऊ सातव, उमेश जाधव, संतोष कटके, विक्रम वाघमारे व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमोल शिवांगी, युवराज कटके, आदिनाथ गाडे, सुहास इनामदार, मुकेश चोबे, दर्पण लाला, रोहन पाटील, शंकर खापणे, सुधीर पाबळे, प्रदीप आडसरे, तसेच वाघोली सोसायटी क्रिकेट कौन्सिल व शांतारामबापू कटके मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.