गेम चेंजर्सचा सुपर ओव्हरमध्ये विजय

पुणे – इलेव्हन स्ट्रायकर्स मॅनेजमेंट आयोजित पहिल्या किंग्ज्‌ स्पोर्टस करंडक अजिंक्‍यपद आंतरक्‍लब टी-20 क्रिकेट स्पर्धेत गेम चेंजर्स क्‍लब संघाने एमईएस क्रिकेट क्‍लब संघाचा सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय मिळवला.

चांदे येथील इन्फिनिटी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात गेम चेंजर्स संघाने एमईएस क्रिकेट क्‍लबचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस क्रिकेट क्‍लबने 20 षटकात 122 धावांचे आव्हान उभे केले.

या आव्हानाचा पाठलाग करताना गेम चेंजर्स क्‍लबच्याही समान धावा झाल्या. त्यामुळे हा सामना निकाली काढण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये गेम चेंजर्स क्‍लबने 1 षटकात बिनबाद 25 धावा केल्या.

एमईएस क्रिकेट क्‍लबला या सुपर ओव्हरमध्ये बाराच धावा करता आल्या.दुसऱ्या सामन्यात गेम चेंजर्स क्‍लबने क्रिएटर्स क्‍लबचा 70 धावांची पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.