मुंबई – भारताचा 16 वर्षीय अव्वल बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानानंद याने पॅरासिन ओपन अ गट बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम फेरीत प्रज्ञानानंदने 7.5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अलेक्झांडर प्रेडकेचा पराभव केला.
त्याने या स्पर्धेच्या एकूण नऊ फेऱ्यांमध्ये 8 गुण मिळवले असून त्याने या स्पर्धेत अवघ्या 0.5 गुणांच्या आघाडीसह हे विजेतेपद पटकावले. प्रेडकेने 7.5 गुणांसह उपविजेतेपद मिळवले. आगामी मोसमात बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्वाची मानली जात होती.
Indian Grandmaster R Praggnanandhaa wins Paracin Open ‘A’ chess tournament 2022
(File pic) pic.twitter.com/onlDEaRbns
— ANI (@ANI) July 16, 2022
प्रज्ञानानंदने 2018 साली ग्रॅण्डमास्टरचा किताब मिळवला होता. अशी कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला होता. तर जगातील केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. भारताचा ग्रॅण्डमास्टर व अव्वल खेळाडू विश्वनाथन आनंद याच्याकडे प्रज्ञानंद सराव करतो.