बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एकेका खेळात आपले वर्चस्व सिद्ध करत असतानाच शुक्रवारपासून सुरू झालेल्या कुस्तीमध्येही भारतीय खेळाडूंनी थाटात सुरुवात केली.
#Wrestling Update 🚨@BajrangPunia 🇮🇳 wins by VFA (Victory by Fall) against Lowe 🇳🇷 (NRU) in 1/8 Finals and advances to the Quarter Finals of Men’s Freestyle – 65 kg 👍#Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/h87KA9uCO6
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पहिल्या फेरीत विजय प्राप्त करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने 65 किलो गटाच्या पुरुष विभागात नेरूच्या लुई बेंगहॅमवर अवघ्या दोन मिनिटांत 4-0 असा दणदणीत विजय मिळवला.
#Wrestling Update 🚨@deepakpunia86 (86kg FS) wins against Mathew Oxenham of New Zealand in pre-quarters by Technical Superiority (10-0)
An easy win for the Indian as he never looked in trouble. All the best Champ 👍#Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/AvaPh2Du4j
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
याबरोबरच दीपक पुनियानेही विजयी सलामी दिली. त्याने 86 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या मॅथ्युऍक्झेनहॅमवर 10-0 अशी एकतर्फी मात केली व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.