नवी दिल्ली : भारताची ऐतिहासिक ‘चांद्रयान-३’ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. दरम्यान, ही चांद्रमोहीम यशस्वी व्हावी यासाठी जगभरातून इस्रोला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यातच तामिळनाडूमधून एका कलाकाराने इस्रोला सोनेरी शुभेच्छा दिल्या आहेत.
तामिळनाडूमधील एका कलाकाराने चक्क सोन्यापासून ‘चांद्रयान-3’चे मॉडेल तयार केले आहे. मरिप्पन असे या कलाकाराचे नाव आहे. चार ग्रॅम सोन्याचा वापर करुन त्याने हे मिनिएचर मॉडेल तयार केले आहे. केवळ 1.5 इंच एवढ्या आकाराचे हे मॉडेल आहे.
“एखादी महत्त्वाची घटना घडत असल्यास, मी नेहमीच सोन्याने असे मिनिएचर मॉडेल बनवतो. ‘चांद्रयान-3’चं लँडिंग हा प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व वैज्ञानिकांसाठी मी हे मॉडेल तयार केलं आहे. 4 ग्रॅम सोन्यापासून हे मॉडेल तयार करण्यासाठी मला 48 तास लागले.”; असे मरिप्पनने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
#WATCH | Tamil Nadu | A Coimbatore-based miniature artist designs a 1.5-inch tall model of #Chandrayaan3 using 4 grams of gold.
Chandrayaan-3’s Lunar Lander Vikram is all set for a soft landing on the moon tomorrow, 23rd August. pic.twitter.com/xkZG7EZRMu
— ANI (@ANI) August 22, 2023
मरिप्पन यांच्या चांद्रयान-3 च्या मॉ़डेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. चांद्रयानाचे हे मॉडेल एका पांढऱ्या चेंडूवर ठेऊन, त्यांनी चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग झाल्याचेही दाखवले आहे.
दरम्यान, चांद्रयान-3 हे लँडिंगसाठी सज्ज झाले असून 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 वाजता ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.