मुंबई – अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी करीना कपूरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यात तिने दोघींनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यानंतर दोघीही एकत्र चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता करीना कपूरने या विषयावर मौन तोडले असून यामागचे सत्यही उघड केले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत करिनाला तिच्या आणि आलियाच्या व्हायरल झालेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आले. यावर अभिनेत्रीने प्रत्युत्तर दिले की, आलियाला कोणत्याही दिग्दर्शकाने चांगली स्क्रिप्ट ऑफर केल्यास मी तिच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. करीना म्हणाली की, ‘मला माहित आहे की तेथे बरेच चांगले दिग्दर्शक आहेत ज्यांच्याकडे उत्तम स्क्रिप्ट आहे. मला वाटते की आजकाल चित्रपटांमध्ये आशय आणि स्क्रिप्टला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे चांगली स्क्रिप्ट असेल तो आमच्याशी संपर्क साधू शकतो. मला आलियासोबत काम करायला खूप आवडेल.
दरम्यान,करीना आणि आलियाने अद्याप एकत्र चित्रपटात काम केलेले नाही. यावरून आलियाने इनस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना आलियाने लिहिले की, “कोणी आम्हाला सोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील.” आलिया भट्टने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल झाली करण जोहरने देखील कमेंट करत लिहिले होते की, “आम्हाला या कलाकारांसह एक चित्रपट हवा आहे.” त्यामुळे आलिया आणि करीना एकत्र चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय चाहते देखील दोघींना एकत्र चित्रपटात पाहण्यास उत्सुक आहेत.