नवी दिल्ली : मागील दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत होती. मात्र आज सलग घसरणीनंतर सोन्याला झळाळी आली आहे. कारण एक तोळ्याची किंमत बाजारात ५८ हजार ८०० रुपये एवढी झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चकाकी काही प्रमाणात वाढून चांदी प्रतिकिलो ७० हजार १०० रुपये एवढी किंमत झाली आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५८,८८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७०,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७०,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,९७३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,८८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९७३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८८० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९७३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,९७३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,८८० रुपये आहे.