मुंबई – अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. अभिनयासह तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती अधिक चर्चेत असते. लवकरच अनन्या पांडे आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
अनन्याने इनस्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाच्या साडी आणि मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. तसेच या लुकला आणखी सुंदर करण्यासाठी तिने हिरव्या रंगाचे कानातले आणि बांगडया घातल्या आहेत. या देसी लुकमध्ये अनन्या फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. अनन्याने तिच्या इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या बांगड्या हायलाइट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये नुसरतच्या जागी अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला ड्रीम गर्लचा हा दूसरा भाग आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्याची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट राज शांडिल्य दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासह अनन्या पांडे, असरानी, परेश रावल, मनजोत सिंग, राजपाल यादव, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बॅनर्जी आणि विजय राज देखील दिसणार आहेत. ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.