मुंबई – मराठी गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी गेल्या कित्येक दिवसांपासून रिलेशलनशीपमध्ये आहे. रिपोर्टनुसार आता त्यांनी गुपचुप लग्न उरकला आहे. दोघांनी लग्नाची गुड न्युज देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आनंदी आणि जसराज या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. दोघांची लव्हस्टोरी नेमकी कधी सुरु झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. गेल्या अनेक महिन्यांभरापासून दोघे विविध रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत होते. पण दोघे अचानक लग्न करतील, असा अंदाज कोणी बांधला नव्हता. दोघांनी अचानक लग्न केल्याने त्यांच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या दोघांनी पोस्ट करत लिहिले आहे की,’अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा अशी नम्रपणे विनंती करतो’ असं लिहीत गुजन्युज दिली आहे. दोघांच्या हातात कोर्टाचं मॅरेज सर्टिफिकेट दिसून येत आहे. याशिवाय मागे वधु – वराची सजावट केलेली दिसते आहे.
दरम्यान, नातेवाईक आणि मित्र – मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केल्याची चर्चा सध्या आहे. आनंदीने तुझ्यात जीव रंगला अशा मराठी मालिकांचं शिर्षक गीत गायल आहे. याशिवाय आनंदी गोपाळ, दुनियादारी अशा मराठी सिनेमांसाठी गायन केलंय. तर दुसरीकजे जसराज जोशीने सुद्धा YZ, आनंदी गोपाळ अशा सिनेमांसाठी गायन केल आहे.