नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू होणार असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल.
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली, गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मोजणी सुरू झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कल सर्वच भाजपच्या बाजूने जात असल्याचे समोर येत आहे.
#GoaElections2022 | Goa CM Pramod Sawant offers prayers at Sri Datta Temple as the countdown begins for the results of the Goa Assembly polls pic.twitter.com/IW47rDjMbf
— ANI (@ANI) March 10, 2022
सर्वच राज्यातील मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. CAPF, PAC आणि पोलिसांना मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आलं आहे.