Mothers day : मातृदिनी सासूबाईंचा फोटो शेअर करत भावूक झाली जेनेलिया; म्हणाली…

मुंबई – देशात आज मातृदिन साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर मातृदिनाचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत आईविषयी वाटत असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सूनबाई अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी आपल्या इन्स्टग्रामवर मातृदिनी सासूबाईंचा फोटो शेअर करून भावूक संदेश लिहिला आहे.

जेनेलिया देशमुखने आपली आई जेनेट डिसूझा आणि सासूबाई वैशाली देशमुख यांचे फोटो शेअर करत मातृदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही माझा सर्वात मोठा आधार आहात म्हणत तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)


आपल्या पोस्टमध्ये जेनिलाय म्हणाली की, ‘प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं, मला समजत नाही. मला ते जाणूनही घ्यायचं नाही. मी तुमच्याशिवाय कामच करु शकत नाही. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. मला माहित आहे, मी तुम्हाला हे फार वेळा सांगितलं नसेल, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं, की ‘आय लव्ह यू’ आणि तुमच्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते’.

मातृदिनी सासूबाईंना आईचा दर्जा देत फोटो शेअर केल्यामुळं सोशल मीडियावर जेनेलियाचे कौतुक होत आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.