पुणे,दि.9- एकतर्फी प्रेमातून तरूणीला लग्नासाठी मागणी घालून त्रास दिल्याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने तरूणीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळल्याचेही उघडकीस आले आहे.
कुतुबुद्दीन हबीब काचवाला ( 23, रा. कसबा पेठ) असे आरोपीचे आहे. याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना जून 2016 ते मे 2021 दरम्यान घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काचवाला व पिडीत तरूणी 2016 मध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. त्यावेळी काचवाला हा तरूणीचा सतत पाठलाग करत होता. तरूणीने तेव्हाच त्याला संबंध ठेऊन शकत नसल्याचे सांगितले होते. तरीही त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला.
भविष्यात तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल, दुसऱ्या सोबत लग्न केल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल अशी धमकी दिली. तरुणीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करीत 40 हजार रूपये आणि एक तोळ्याची अंगठी घेतली. तिच्या मागे लागून अश्लिल बोलून तिचा विनयभंग केला. तिची बदनामी करण्याची धमकी दिली