Sunetra Pawar property | बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडे एकूण 127 कोटी 59 लाख 98 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता एकूण 70 कोटी 95 लाख 99 हजार रुपयांची आहे, तर अजित पवार यांच्याकडे एकूण 50 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता आहे. सुनेत्रा पवार यांनी सासू आशाताई पवार यांना 82 लाख 81 हजार रुपये दिले आहेत, तर अजित पवार यांना 63 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख रुपये, तर नणंद सुप्रिया सुळे यांना 35 लाख रुपये दिले असल्याचे शपथपत्रात दिले आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर 12 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज असून, पती अजित पवार यांच्यावर 4 कोटी 74 लाख रुपयांचे कर्ज आहे. विशेष बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांना वारसा हक्काने 33 कोटी 9 लाख रुपयांची संपत्ती मिळाली आहे, तर अजित पवार यांना वारसा हक्काने 75 लाख रुपयांची संपत्ती मिळाली आहे.
मालमत्तेचा तपशील Sunetra Pawar property |
– सुनेत्रा पवार यांचे वार्षिक उत्पन्न – 4 कोटी 22 लाख
– अजित पवार यांचे वार्षिक उत्पन्न – 80 लाख 76 हजार
– व्यवसाय
– जंगम मालमत्ता – 29 कोटी 65 लाख
(मुदत ठेवी, शेअर्स, सोने, बचत योजना)
– पवार कुटुंबीयांकडे सुमारे एक किलो सोन्याचे दागिने, 21 किलो चांदीच्या मूर्ती, 20 किलो चांदीच्या भेटवस्तू, 35 किलो चांदीची भांडी, तसेच 24 लाखांचे हिरे
– स्थावर मालमत्ता 97 कोटी 94 लाख 68 हजार
(सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोंडांबेवाडी येथे जमिनी आहेत, तर कल्याणीनगर, सिंध सोसायटी, बिबवेवाडी, मुंबईत वरळी येथे सदनिका आहेत. अजित पवार यांच्या नावावर काटेवाडी, बारामती आणि मुंबईत वरळी येथे, तसेच पुण्यात औंध येथे सदनिका आहेत.
वाहने – दोन ट्रक़्टर, होंडा सीआरव्ही, टोयाटो कॅम्ब्रे,
एकूण कर्ज – 17 कोटी रुपये
शिक्षण – बी. काॅम.