भीमा नदीकाठी वसलेले वाकसे टाकळी हे गाव उजनी धरणाच्या पोटात गेल्याने वाकसे कुटुंबाच्या नशिबी स्थलांतराची वेळ आली. हे वयाच्या पाचव्या वर्षापासून गजानन वाकसे यांनी पाहिली होते. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी योगदानाला व संघर्षाला तिथुच सुरुवात झाली. शालेय जीवनापसूनच गोरगरिबांची बाजू कायम उचलून धरून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झटत राहणे हेच आयुष्यातील ध्येय. आणि 24 तास सामान्य व गरीब जनता केंद्रस्थानी ठेवून झटणाऱ्या लासुर्णे (ता. इंदापूर) या गावातील सामन्य ओबीसी कार्यकर्त्यावर भाजप पश्चिम महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचबरोबर गावाच्या विकसासाठी भाजपच्या नेत्यांद्वारे सढळ हाताने निधी मिळत असल्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वाकसे हे दिवस-रात्र एक करीत आहेत. गोरगरिबांच्या आणि गावाच्या हितासाठी कायम झटणाऱ्या गजानन वाकसे यांची “गोरगरीब जनतेचा कैवारी’ म्हणून इंदापूर तालुक्यात ओळख आहे.
त्यांच्या विकास कार्यावर “प्रभात’ने खास टाकलेला “फोकस’…
सामान्य कुटुंबातील उमदे व गोरगरीब जनतेच्या कामासाठी आक्रमकपणे बाजू उचलून धरणारे (ओबीसी) सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे हे आठ वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांच्या कार्याने प्रेरित झाल्याने वाकसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यावर दौंड तालुक्याचे युवा आमदार आरोग्य दूत राहुल (दादा) कुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना भाजपचे तात्कालिन जिल्हा अध्यक्ष तथा माजी राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी वाकसे यांच्यावर सात वर्षां पूर्वी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. झटून काम करत असताना 24 तास जनतेला उपलब्ध राहून सामान्य व गरीब जनता केंद्रस्थानी ठेवून काम करायचे हे निश्चित केलेल्या युवा पदाधिकारी वाकसे यांची चिकाटी पाहून त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांनी त्यांच्या भागातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लासुर्णे परिसरासाठी दिला.
या निधीमध्ये लासुर्णे परिसरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावास सुमारे 7 कोटी रुपये मंजूर केले होते, ज्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. याचबरोबर गावातील दोन्ही स्मशानभूमी, सुशोभीकरण, आहिल्यानगर-वैद वाडी भागातील कॉंक्रीट रस्ते करणे, गावठाणातील ओबीसी वस्तीमधील रस्ते, समाज मंदिरांच्या विकास कामामध्ये हातभार, सौर दिवे बसवणे आदी कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाकसे यांनी वरिष्ठांकडून कसलेही अर्थसाहाय्य किंवा कोणतीही मदत न घेता पक्षाच्या नावावर उमेदवार उभा करून प्रस्थापितांना एकतर्फी वाटत असेलेली निवडणूक चुरशीची केली होती.
करोनाची लाट मंदावल्यार इतर पुढारी सामान्य लोकांना कुठेतरी 4/2 किलो धान्य देऊन फोटो सेशनमध्ये व्यस्त होते, त्यावेळी वाकसे यांनी युवा मित्रपरिवाराच्या मदतीने वालचंदनगर, निमगाव केतकी येथील कोविड सेंटरला अविरत सकस आहार म्हणून अंडी व केळी पुरवण्याचे कार्य केले. याही पुढे जाऊन युवा संघटनाने करोनाकाळात शासनाच्या सहकार्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रक्तदान केले. आज गजानन वाकसे हे भाजप पश्चिम महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस कार्यरत असून संघ व संटनेच्या वरिष्ठ मान्यवर मंडळींच्या दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत आहेत.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील सध्याच्या सरकार विरोधी सर्वच आंदोलनात वाकसे यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
करोनात 24 तास उपलब्ध
मूळ इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त असलेले वाकसे हे युवा ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात, त्यांचे ओबीसी वर्गात मोठे संघटन असल्याचे मागील दोन विधानसभेला त्यांनी दाखवून दिले. कौतुकास्पद बाब म्हणजे देशावर करोनाचे संकट आले होते, त्यावेळी भल्याभल्या नेतेमंडळींनी स्वत:ला कोंडून घेतले होते. तेव्हा वाकसे आपल्या कार्यालयात लोकांना मदतीसाठी 24 तास उपलब्ध होते.
हर्षवर्धन पाटलांचे मार्गदर्शन
कोविड काळात आरोग्य कर्मचारी, पोलिसांना आयुर्वेदिक औषधी, रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले. कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ भाजपच्या वतीने केला आहे. भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार व प्रदेश सचिव अशोक चोरमले यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
…अन् त्यात आले यश
इंदापूर तालुक्यातून जात असलेल्या तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामात गायरान व गावठाणातील रहिवासी जे यात बाधित होत आहेत त्यांना मालकी हक्काप्रमाणे मोबदला मिळवून देण्यासाठी त्यावेळचे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला होता व त्याला यश मिळाल्यानेच गोरगरिब जनतेचा कैवारी म्हणून गजनान वाकसे यांच्या नावाची इंदापूर तालुक्यात ओळख आहे.
शब्दांकन : रोहित वाघमोडे (लासुर्णे)