दौंड तालुक्यात कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात हार्मोनि ऑरगॅनिक या नावाने सुरू केलेले रोपटे आज वटवृक्षाच्या रूपांतर झाले असले तरी कंपनीने आपली सामाजिक कार्यातील ओळख तशीच ठेवली असून ती उतोरोत्तर वाढत असल्याने हार्मोनिने मोठी सामाजिक झेप घेतली आहे. हार्मोनि ग्रुपचे चेरअरमन रवी नांगिया हे विविध सामाजिक उपक्रमांसाठी नियमितपणे सढळ हाताने निधी देण्यासाठी कायम आग्रही असतात. समाजाप्रती आपली निष्ठता सिद्ध करणाऱ्या हार्मोनि कंपनीच्या कार्याचा घेतलेला आढावा…
आयआयटी कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या एका 72 वर्षीय यशस्वी उद्योगाची प्रेरणादायी प्रवासाला अधोरेखित करणारी व शेकडो कुटुंबांना आर्थिक आधार देऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हार्मोनि कंपनीतील प्रत्येक जण आघाडीवर आहे.
एका समृद्ध व उच्च शिक्षित कुटुंबातील रवी नांगिया यांचा ध्येयवादी प्रवास हार्मोनिच्या रुपात समोर येत आहे. रासायनिक क्षेत्रात आपल्या कौशल्याने व स्व:कर्तृत्वावर भरारी घेऊन जागतीक स्तरावर सुगंधी द्रव्याच्या व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. आज कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना व रोटरी क्लबच्या अध्यक्षीय कालावधीच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांना मोफत औषधांच्या सोयी उपलब्ध करून देण्यात रवी नांगिया यांनी भरीव योगदान दिले आहे.
कुरकुंभ-पांढरेवाडी मधील दुष्काळाच्या संकट समयी कंपनीचे कमर्शियल मॅनेजर दीपक चौधरी यांनी वैयक्तिक ग्रामीण भागात टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शालेय साहित्याच्या माध्यमातून शिक्षणास मदत करणे किंवा कोणत्याही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या नांगीया यांनी आपल्या कर्तव्याची चुणुक दाखवत या कार्यास आपल्या कौशल्याने पूर्ण केल्याचे आजवर दिसून आले आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमातील सहभागाने हार्मोनिला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे.
कंपनीचे प्रेसिडेंट आर. एल. चव्हाण हे केमिकल इंजिनिअर असून त्यांनी आयाअयएम इंदोरमधून व्यवस्थापणाचे प्रशिक्षण घेतले आहे. वयाची 35 वर्षे ते रासायनिक प्रक्रिया उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली 6 वर्षे त्यांनी आपल्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत सेवा दिली असून, त्याच्या कारकिर्दीत त्यांनी समाज जोडून ठेवला आहे. त्यांनी मोठमोठ्या कंपन्याचे व्यवस्थापन अतिशय उत्तम प्रकारे हाताळले आहे. समाज कल्याण कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात.
हार्मोनि ऑर्गनिक्स प्रा.ली.कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एम. डी.) गोविंद खेतान हे देखील आपला औद्योगिक क्षेत्रातील अनुभव पणाला लावून हार्मोनिचा आलेख उंचावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा फायदा हा हार्मोनि करिता खुप उपयोगी ठरताना दिसत आहे. यापुढे ही अनेक बदल करण्यात येतील व वातावरण निर्मिती केली जाईल असेही त्यांनी सांगितले. हार्मोनिचा अजून काया पालट होईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे कंपनीचे भविष्य अजूनही उज्ज्वल करण्याकडे त्यांनी भर दिला.
औद्योगिकरण व पर्यावरणाचा समतोल!
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात एकीकडे पर्यावरणाचा प्रश्न भेडसावत असताना याच क्षेत्रातील
हार्मोनि ऑरगॅनिक्स ने मात्र औद्योगिकरण व पर्यावरणाचा समतोल राखून उत्पादन करण्यावर भर दिला असल्याचा दिसून येत आहे. रासायनिक प्रक्रियेत वापरले जाणारे पाणी पुन्हा प्रक्रिया करून इतर प्रक्रियेसाठी वापरात घेऊन प्रदूषणाच्या उद्देशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील एक आदर्श उद्योग म्हणून आज दिमाखात उभा राहण्याची क्षमता निर्माण केली आहे.
कंपनीच्या प्रतगीसाठी झटणारे हात
कंपनीच्या प्रगती करिता हार्मोनिचे चेअरमन रविकुमार नांगीया, हार्मोनी ऑर्गनिक्स प्रा.ली.कंपनीचे एम. डी. गोविंद खेतान, प्रेसिडेंट हार्मोनि ऑर्गनिक्स आर. एल. चव्हाण, व्ही. पी. (ऑपरेशन) नीलेश ठाकूर, व्ही. पी. (प्रोजेक्ट) सुनील अडप, व्यवस्थापक दीपक चौधरी आदी प्रयत्नशील आहेत.
– शब्दांकन :
विनोद गायकवाड (कुरकुंभ)