पिरंगुट (वार्ताहर) – मुळशी तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.९९ टक्के लागला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची असलेली प्रतिक्षा अखेर संपली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात घट झाली असून ०.२३ टक्के निकाल कमी लागला आहे. तर तालुक्यातील २६ शाळांचे निकाल हे शंभर टक्के लागले आहेत. गतवर्षी ३६ शाळा शंभर नंबरी ठरल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. गतवर्षी पेक्षा यावर्षी पंधरा दिवस आधीच निकाल जाहिर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दहावीच्या परीक्षेसाठी मुळशी तालुक्यातून ०६ परीक्षा केंद्रावर ५० शाळांमधील एकूण ३१३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ३११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून २९९४ विद्यार्थी पास झाले आहेत. ७९४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १३०० विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर ७२८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १७२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
१००% निकाल असलेल्या शाळा पुढीलप्रमाणे…
मामासाहेब मोहोळ विद्यालय मुठा, मामासाहेब मोहोळ विद्यालय शेरे, विद्या विकास मंदिर आंदगाव, सेनापती बापट माध्यमिक विद्यालय माले, मुळशी धरण प्रशाला पोमगाव,
माध्यमिक विद्यालय कुळे, माध्यमिक विद्यालय काशिग, श्री विंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली, संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे, माध्यमिक विद्यालय कोळवडे,
बाबुराव ढमाले माध्यमिक विद्यालय वांद्रे, अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय कोंढुर, शार्दूल एस जवाहर माध्यमिक विद्यालय बावधन, विद्याभवन इंग्लिश मिडीयम स्कुल पिरंगुट, धनराज माध्यमिक विद्यालय वाकड, रामचंद्र शितोळे इंग्लिश मिडीयम स्कुल मारुंजी, न्यू इंग्लिश स्कुल माण,
दि जिनियस इंग्लिश मिडीयम स्कुल, पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल बावधन – सुस – पिरंगुट, दासवे पब्लिक स्कुल लवासा, मामासाहेब मोहोळ मेमोरिअल स्कुल पिरंगुट, सुदर्शन विद्या मंदिर पिरंगुट, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा नांदे, दि न्यू डेल इंग्लिश मिडीयम स्कुल.
अन्य शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे…
पिरंगुट इंग्लिश स्कुल पिरंगुट -९६.९४ टक्के, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड – ९८.९४, न्यू इंग्लिश स्कुल घोटावडे – ९७.५२ टक्के, न्यू इंग्लिश स्कुल कोळवण – ९८.४१ टक्के, श्री भैरवनाथ विद्यालय रिहे – ९६.७२, न्यू इंग्लिश स्कुल हिंजवडी – ९५.४५ टक्के, माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे – ९७.४० टक्के, नरसिंह, विद्यालय ताथवडे – ९६.५५ टक्के,
नामदेवराव मोहोळ विद्यालय खांबोली – ९७.०५ टक्के, चेतन दत्तात्रय गायकवाड विद्यालय बावधन खुर्द – ९८ टक्के, महात्मा फुले विद्यालय लवळे – ९७.१८ टक्के. आप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे – ९६.१५ टक्के, कै. बाबुराव रायरीकर विद्यालय उरवडे – ९८.४८ टक्के, पीसीएमसी माध्यमिक विद्यालय थेरगाव – ८६.०९ टक्के,
तुकाई माध्यमिक विद्यालय नेरे – ९१.४२ टक्के, माध्यमिक विद्यालय भुगाव – ९८.९३ टक्के, न्यू इंग्लिश स्कुल मारुंजी – ९७.२६ टक्के, पीसीएमसी माध्यमिक विद्यालय वाकड – ७८.८४ टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे – ८८.४६ टक्के,
संपर्क ग्रामीण विकास केंद्र भांबर्डे – ९७.२९ टक्के, कै. सोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे – ८६.६६ टक्के, न्यू इंग्लिश स्कुल सुसगाव – ९६.६६ टक्के, श्रीमती अनुसई विद्यालय पुनावळे – ८८.३७ टक्के, सेंट्रल सेकंडरी स्कुल ५० टक्के