शिर्डी लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात
वाकचौरेंनी अर्ज मागे न घेतल्याने होणार तिरंगी लढत
नगर – शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अशोक गायकवाड, राजेंद्र वाघमारे यांच्यासह आठ जणांनी माघार घेतल्याने आता 20 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे. भाजपकडून या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने शिर्डीत तिरंगी लढत होत आहे.
डॉ. अरुण प्रभाकर साबळे (अपक्ष), क्रांती अरुण साबळे (अपक्ष), अशोक रामचंद्र गायकवाड (अपक्ष), भुमिका आशिष बागूल (अपक्ष), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (अपक्ष), प्रकाश गुलाब वाघमारे (अपक्ष), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (अपक्ष), अंबादास लक्ष्मण सरोदे (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 जणांची उमेदवारी कायम राहिली आहे.
निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (कॉंग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), गोविंद बाबुराव अमोलिक (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष) यांचा समावेश आहे.