दीक्षाभूमीसाठी निधी कमी पडू देणार नाही

भोर येथे आमदार थोपटे यांचे आश्‍वासन

भोर – येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या रुपाने दिक्षा भूमी व्हावी ही आंबेडकरी जनतेची मागणी होती. दीक्षाभूमी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाठपुरावा करुन नगरपालिकेच्या बंद पडलेल्या बहुउद्देशीय हॉलची जागा ठराव करुन ही जागा दिक्षा भूमीसाठी उपलब्ध करुन दिली. सर्व सुविधायुक्‍त अशा इमारतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या पूर्वी 30 लाख रुपये खर्च संरक्षण भिंत बांधलेली आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्‍वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.

भोर नगरपालिकेच्या बहुउद्देशीय हॉलच्या हस्तांतरीत केलेल्या जागेत दिक्षा भूमी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याचबरोबर शहरातील दोन कोटी रुपये खर्चांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजनही आमदार थोपटे यांचे हस्ते झाले. यावेळी कॉंग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली शेटे, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, सुमंत शेटे, तानाजी तारु, गजानन दानवले, उमेश देशमुख, ऍड. विश्‍वनाथ रोमण, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, महेश भेलके, कैलास ढवळे, डॉ. प्रा. रोहिदास जाधव, बजरंग शिंदे, समीर वरपे, निसार नालबंद, आकाश सागळे, संतोष ढवळे, प्रा. शंकर माने, राजन घोडेस्वार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शंकर माने, सूत्रसंचालन आनंदा जाधव यांनी, तर राजन घोडेस्वार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)