वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील पाले येथे नूतन मंदिराची वास्तुशांत, मारुतीची प्राण-प्रतिष्ठा समारंभ भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वरवडी खुर्द , वरवडी बुद्रुक, वरवडी डायमुख, पाले ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात महासंकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महापूजा, महानैवेद्य,भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. दुपारी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तुकाराम भिलारे,रघुनाथ भोसले, दिलीप वरे, राजाराम तुपे, विजय तुपे, सचिन पाटणे, अरुण वरे, दिगंबर पालकर, बाळासाहेब पोळ, आबा तुपे, ओमकार भिलारे, नामदेव खोपडे, वरवडी पंचक्रोशीतील बहुसंख्य भक्त भाविक उपस्थित होते.