भोर,(प्रतिनिधी) – रामबाग,भोर येथील दूध शीतकरण केंद्रात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रजच्या माध्यमातून व भोर दूध शीतकरण केंद्राच्या प्रयत्नातून भोर तालुक्यातील तब्बल २० विविध दूध उत्पादक सहकारी संस्थांना पशु खाद्य विक्रीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप करण्यात आले. कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, संचालक दिलीप थोपटे यांच्या हस्ते दूध संस्थांचे चेअरमन आणि संचालक यांचा धनादेश,शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प आणि देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी समस्या आपल्या मांडल्या. कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे यावेळी आश्वासन दिले.
कार्यक्रमासाठी कात्रज संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर,दूध संघाचे संचालक दिलीप थोपटे,व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये,दिलीप वरे,दूध संकलन अधिकारी सुभाष मोडक,नथुराम दामगुडे,पांडुरंग गोरड,बाळासाहेब जेधे,दीपक कुमकर,एकनाथ शिळीमकर,आबासाहेब जगदाळे,संतोष नांगरे,अशोक कोंढाळकर बाळासाहेब भिलारे,स्वाती चव्हाण,वर्षा थोपटे, महेश मरगजे,कुंडलिक थोपटे, यांसह विविध दूध संस्थांचे चेअरमन, प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक भोर दूध शीतकरण केंद्राचे प्रमुख राहुल दिघे यांनी केले. तर, सूत्रसंचालन मनोज धुमाळ यांनी केले. तर, आभार सुभाष मोडक यांनी व्यक्त केले.