हिमस्खलनात चार जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : सियाचीन येथील भारतीय लष्कराच्या ठाण्यावर हिमस्खलम झाल्याने सोमवारी चार जवानांसह सहा जण मरण पावले. त्यायत दोन हमलांचा समावेश आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान मरण पावलेल्या जवानांचे मृतदेह बुधवारी लडाखहून त्यांच्या गावी पाठवण्यात येणार आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

मनिषकुमार, वीरपालसिंग, डिंपनकुमार आणि मनिषकुमार अशी मृत पावलेल्या नावे आहेत.

हिमस्खलन ज्या पथकावर आदळले, त्या लष्कराच्या गस्ती पथकात आठ जणांचा समावेश होता. हिमस्खलन झाल्याने ते बर्फाखाली गाडले गेले. ते अठरा हजार फूट उंचीवरील तळावर जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. त्यात सात जण गंभीररित्या झखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील सहा जणांचा तीव्र थंडीमुळे मृत्यू झाला.

या हिमस्खलानात मरण पावलेल्या जवान आणि नागरिकांबाबत लष्कर प्रमुख बिपीन रावत शोक व्यक्त केला. जवान आणि हमालांच्या मृत्यूममुळे मला खूप वेदना झाल्या. मी त्यांचे धैर्य आणि देशसेवेला सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुख:त मी सहभागी आहे, असे ट्‌वि ट त्यांनी केले. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी जवानांच्या मृत्यूमुळे तीव्र वेदना झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हवामान, पर्यावरण आणि अन्य घटनांमुळे 1984 पासून 860 जवान मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्यावर्षी 20 जवान हिमस्खलनात मरण पावले होते. त्यातील एक लान्स नायक हनुमंतप्पा हे आठवडाभर बर्फाखाली गाडले जाऊनही जीवंत राहिले होते. मात्र नंतर त्यांचाही मृत्यू झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)