दारू पिऊन आई, बहीण, मेव्हणीवर बलात्कार करणाऱ्याची हत्या

भोपाळ : दारू पिल्यानंतर आई, बहीण आणि मेव्हणीवर बलात्कार करणाऱ्याची त्याच्या वडिलांनीच हत्या केली. अत्यंत खळबळजनक घटनेत त्याच्या चार कुटुंबियांना पोलिसांनी अटक केली आहे.

हा तरूण दारू पिऊन आल्यानंतर आई, बहीण आणि मेव्हणीवर वारंवार बलात्कार करत असे. या तरूणाचा मतदेह पोलिसांना मध्यप्रदेशातील दातिया येथे 12 नोव्हेंबरला सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार पुढे आला.

कुटुंबियांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या कृतीने त्याचे कुटुंबिय संतप्त झाले होते. त्यांचा राग अनावर झाला होता. 11 नोव्हेंबरला रात्री दारू पिऊन त्याने मेव्हणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी त्याचे कुटुंबीय मध्ये पडले. त्यांनी त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणात आटक केलेल्या कुटुंबियांना न्यायलयापुढे हजर करण्यात आले. तेथे त्याच्या वडीलांनी हत्येची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.