श्रीनगर– जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत हिमस्खलन झाले. त्या दुर्घटनेत लष्कराचे तीन जवान मृत्युमुखी पडले. (Three soldiers of the Indian Army died in an avalanche in the Kupwara district of Jammu and Kashmir on Friday) कुपवाडा जिल्ह्यातील माछिल क्षेत्रात हिमस्खलन झाले. त्या दुर्घटनेवेळी काही जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
त्याविषयीची माहिती मिळताच तातडीने शोध आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. हिमस्खलन झाले त्या ठिकाणी तीन जवानांचे मृतदेह आढळले.
बर्फाच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती जवान अडकले त्याची माहिती तातडीने मिळू शकली नाही. संबंधित दुर्घटनेविषयीचा अधिक तपशीलही उपलब्ध होऊ शकला नाही.