साओ पावलो (ब्राझिल) :- ब्राझिलचे उजव्या विचारसरणीचे माजी अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांना 2030 पर्यंत देशातील निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये अधिकारांचा गैरवापर आणि देशाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेवर बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल बोल्सोनारो यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
शुक्रवारी न्यायाधीशांच्या पॅनेलने बोल्सोनारो यांना 2030 पर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी घातली. या बंदीमुळे 68 वर्षीय बोल्सोनारो यांचे राजकीय करिअर धोक्यात आले आहे. या बंदीमुळे देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते पुन्हा लढवू शकतील का याबाबत शंका निर्माण झाली आहे.
बोल्सोनारो यांनी अध्यक्ष असताना सरकारी माध्यमांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला आणि जनतेच्या मनात इलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली, असा निष्कर्ष दोन सदस्यीय पॅनेलने दिला.
18 जुलै 2022 रोजी बोल्सोनारो यांनी सरकारी कर्मचारी आणि सरकारी वृत्तवाहिनीला अध्यक्षीय प्रासादामध्ये बोलावून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. मात्र हा निर्णय द्वेषपूर्ण, लोकशाहीविरोधी, प्रक्षोभक भाषणामधून जनमानसाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करणारे, घृणास्पद विकृत माहितीला प्रोत्साहन दिले गेले, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
ब्राझिलचे माजी अध्यक्ष फर्नांडो कॉलर डी मेलो आणि विद्यमान अध्यक्ष लुईझ इन्सिओ लिला यांनाही पूर्वी अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र त्यांची अपात्रता सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.