रिओ-डी-जानिरो – आंध्र प्रदेशातली मूळ जात असलेली ही नेल्लोर गाय ब्राझीलमध्ये 40 कोटी रुपयांत विकली गेली आहे. या गायीला व्हिएटिना-19 एफआयव्ही मारा इमोव्हिस म्हणूनही ओळखलं जातं. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीची किंमत 4.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती. यामुळे ही जगातील सर्वात महागड्या किमतीत विकली गेलेली गाय ठरली आहे. या गायीचं नाव आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. (This is the world’s most expensive cow, she was sold for 5,998,586,000 Billion Naria)
This is the world’s most expensive cow, she was sold for 5,998,586,000 Billion Naria pic.twitter.com/KCHoo6KfLY
— Instablog9ja (@instablog9ja) March 26, 2024
ब्राझीलमध्ये या जातीला मोठी मागणी आहे. या जातीला वैज्ञानिकदृष्ट्या बॉस इंडिकस असं म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, बॉस इंडिकस भारतातील ओंगोले गुरांचे वंशज आहे, जे त्याच्या ताकदीसाठी ओळखले जाते. गायींची ही प्रजाती वातावरणानुसार स्वतःला जुळवून ते. ही प्रजाती 1868 मध्ये जहाजाने प्रथमच ब्राझीलला पाठवण्यात आली होती. तर 1960 च्या दशकात आणखी अनेक गायी येथे हलवण्यात आल्या.
ओंगोले जातीच्या गुरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उष्ण तापमानातही जगू शकतात. ब्राझीलमध्ये खूप गरम हवामान असतं, त्यामुळे या गायीला तिथे पसंती मिळते. तिथले लोक या प्रजातीच्या गायी सहज पाळू शकतात. ब्राझीलमधील सुमारे 80 टक्के गायी नेल्लोर प्रजातीच्या आहेत.